निपाणी (वार्ता) : येथील एमआयटी संस्थे तर्फे येथील महर्षी वाल्मिकी समुदाय भावनांमध्ये ‘फॅशन उमंग’ आणि वेशभूषा प्रदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील घाळी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
संस्थेच्या प्रमुख पद्मिनी मोरबाळे यांनी, सलग आठ वर्षे शहरात ‘फॅशन उमंग’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले. यावेळी
प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील यांनी ‘तिला समजून घेताना’ विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी विशाल मिरजे, विमल चव्हाण, राधाबाई पाटील, स्नेहा पोतदार, सुनीता सोळंकुरे व महिलांचा सत्कार झाला. यशश्री भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी परिसरातील महिलांची उपस्थिती होती.