आडवी सिद्धेश्वर स्वामी; शहीद जवान सागर बन्ने स्मारकाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : प्रपंचामध्ये मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे. जीवनात किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचा आहे. मानव जीवन क्षणभंगुर असून जीवनात वेळेच्या सदुपयोग करून घ्यावा. जन्म घेतल्यानंतर समाजासाठी जगून जीवनाचे कल्याण करून घ्यावे,असे आवाहन आडवी सिद्धेश्वर मठाच्या स्वामिनी केले. बेनाडी येथील शहीद जवान सागर बन्ने यांच्या अर्ध पुतळ्यासह स्मारकाचे शुक्रवारी (ता.१२) अनावरण झाले. त्याप्रसंगी स्वामी बोलत होते.
प्रारंभी उमेश हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर आडवी सिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते उद्घाटन झाले.
इचलकरंजी येथील प्राचार्य झेम्बियार फर्नांडिस यांनी, शहीद जवान सागर बन्ने यांच्या नावे सामाजिक संस्था काढून त्याद्वारे समाजाचे गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपचार व शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी आप्पासाहेब बन्ने, अक्काताई बन्ने, सिध्दव्वा बन्ने, सुनील बन्ने, सोनाली बन्ने, विलास बन्ने, मायव्वा बन्ने, बिरसिध्दा बन्ने, रामचंद्र बन्ने, राघू बन्ने, सिध्दाप्पा बन्ने, पार्वती बन्ने, ग्रामपंचायत अध्यक्ष सत्यापा हजारे, अण्णाप्पा बन्ने, विलास मिरजे, रामचंद्र बन्ने, अमित सौंदलगे, शिवानंद कट्टीकर, महादेव लवटे, सागर पिंपळे, संतोष चिकोडे, अविनाश हजारे, जकाप्पा हजारे, राहुल मंगावते, चंद्रकांत माळगे, पांडुरंग पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.