पालकमंत्री सतीश जारकीहोळी; राज पठाण यांची घरवापसी
निपाणी (वार्ता) : माजी नगरसेवक राज पठाण, शेरगुलखान पठाण यांच्यासह बेफारी समाज, सहारा स्पोटर्स, नागराज युवक मंडळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून पक्षाला साथ दिले आहे. त्यामुळे काँग्रेसपक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या या ताकदीने काँग्रेसचा विजय निश्चीत आहे, असे मत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. माजी नगरसेवक राज पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
राज पठाण म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांची भाजपात घुसमट होत होती. त्यामुळे स्वघरी परत आलो आहे. जारकिहोळी यांना मताधिक्य देण्यास आपण कटीबध्द आहोत.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, हालशुगरचे संचालक सुकुमार पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, बख्तियार कोल्हापुरे, अल्ताफ बागवान, यासीन मणियर, फारूक गंवडी, अब्बास फरास, जावेद नाईक, इर्शाद बागवान, करीम बागवान, शकिल चावलवाले, सुंदर खराडे, शेरीफ बेफारी, राजेंद्र चव्हाण, अन्वर बागवान, इलियास पटवेगार, फजल पठाण, हसन मुल्ला, जमीर पठाण, मुसा पटेल, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.