Friday , December 8 2023
Breaking News

सर्वांच्या सहकार्याने सभापती पदाचा कार्यकाल पूर्ण

Spread the love
सद्दाम नगारजी : नूतन ११ सदस्यांची निवड
निपाणी (वार्ता) : मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्यावर विश्वास ठेवून नगरपालिका सभापतीपदी निवड केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाचा कार्यकाल सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पूर्ण केला आहे. त्या काळात नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शहराच्या विकास कामांमध्ये आपणाला सहभागी होता आल्याची माहिती मावळते सभापती सद्दाम नगारजी यांनी दिली.
यावेळी स्थायी कमिटीची निवड सद्दाम नगारजी यांनी जाहीर केली. त्यामध्ये सदस्यपदी नगरसेवक राजू गुंदेशा, विनायक वडे, संतोष सांगावकर, नगरसेविका सुजाता कदम, राणी शेलार, रंजना इंगवले, दिपाली गिरी, अरुणा मुदकुडे, कावेरी मिरजे, सोनल कोठडिया यांचा समावेश आहे. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चैत्यभूमी ही मानवी मूल्यांची क्रांती भूमी आहे : प्रबोधनकार मिथुन मधाळे

Spread the love  निपाणी : दादरच्या चैत्यभूमीवरील जनसमुदाय पाहता मानवी जीवन मूल्याची प्रेरणा मिळण्याची स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *