शाळा, घरावरील छतांचे नुकसान; विद्युत वाहिन्या खांब, जमीनदोस्त
निपाणी (वार्ता) : निपाणीसह परिसरात सोमवारी (ता.१३) सायंकाळी आणि रात्री वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फांद्या कोसळल्या असून विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर विद्युत खांब आणि वाहिन्या जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना अंधारातच रात्र काढावी लागली.
बौद्ध नगर परिसरातील विद्या मंदिर शाळेवरील अनेक ठिकाणचे छत उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले त्याशिवाय पंतनगर परिसरातही शाळेवरील छताचे पत्रे परिसरातील घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. जुना पी. बी. रोड येथील बेळगाव नाका, संत बाबामहाराज कॉम्प्लेक्स, डॉ. कुरबेट्टी हॉस्पीटल, म्युनिसिपल हायस्कूल शेजारील मार्गावरील मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक कोलमडली होती.
जामदार प्लॉट दुसरी गल्ली मधील आंबा व फणसाची मोठी झाडे कोसळली. यामुळे दोन दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. तर विद्युत वाहिन्या तुटल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता.
येथील बेळगाव नाक्यावरील माऊली रेडियम दुकानावर उंबराचे झाड कोसळून अमोल माहूरकर यांचे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे.
महात गल्ली येथे विजेचे खांब वाहनांवर पडले आहे. त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वरील सर्वच घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. शहरातील जुनाट आणि जीर्ण झालेली विद्युत खांबे बदलण्यासाठी नागरीकांनी वारंवार हेस्कॉम विजपुरवठा विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून याकामी हलगर्जीपणा करण्यात आल्यामुळे शहरातील विजेचे खांब कोसळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.
रात्री सुमारे तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. सायंकाळच्या सत्रात अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. विद्युत खांब आणि वाहिन्या पडल्याने शहरात काही ठिकाणी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
आता बॅनर होर्डिंग चा मुद्दा वेळ आहे तोपर्यंत च,प्रशाशनाने हताळावा ।
वंदेमातरम। ।