निपाणी(वार्ता) : ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज बाजीराव साळोखे यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र त्यांना निपाणी येथे देण्यात आले.
यावेळी युवराज साळोखे यांनी ४ ह्युमन राईट्स संघटनेच्या माध्यमातून सर्व स्तरावरील सामाजिक कार्य निस्वार्थीपणे संघटनेच्या सर्वांना विश्वासात घेवून केले जाईल असे सांगितले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल ताडे, संचालक ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन पोवार, अशोक खांडेकर, युवराज शेटके, विशाल काशीद, अतुल साळोखे, मयूर रोकडे, राजू सय्यद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta