सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे
निपाणी (वार्ता) : शहर व उपनगरातील नागरिकांना येथील जवाहर जलाशयातून केला जातो. पण पावसाळ्यातील पाणी येण्याचा मार्गावरील झाडे झुडपे व कचऱ्याची स्वच्छता गेल्या पाच वर्षापासून सचिन लोकरे आणि सामाजिक कार्यकर्त्यातर्फे केली जात आहे. या उपक्रमाचे कौतुक होत असून स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी पत्रकांन्वये विचारला आहे.
पत्रकातील माहिती अशी, जवाहर तलाव परिसराची स्वच्छता, त्यामधील गाळ काढण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. पण पालिका प्रशासन गप्प बसून आहे. तलावातील गाळ स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने काढण्यासाठी अनेक नवीन संशोधन झाले आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यंत्राच्या साहाय्याने जलाशयातील गाळ काढण्यासाठी मान्सून सुरू होण्यापूर्वी नगरपालिकेने त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे.
शहराला तीव्र पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते आहे. निदान पाणी साठा वाढविण्यासाठी तरी गाळ काढण्याचे प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहनही माजी सभापती प्रा. चिकोडे यांनी पत्रकारद्वारे केलेआहे.