निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या विजयी झाल्या. त्यांना निपाणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काकासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. शिवाय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
निवडणुकीच्या काळात निपाणी मतदार संघात सर्वांनी एकजूटपणे काम काम केले आहे. शिवाय कार्यकर्त्यांनीही मेहनत घेतल्याने सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याचे माजी आमदार काकासाहेब पाटील सांगितले.