Sunday , September 8 2024
Breaking News

सौरमित्र योजनेमधून शेतकऱ्यांना न्याय द्या

Spread the love

 

राजू पोवार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निपाणी (वार्ता) : सौमित्रच्या वेबसाइटवर सौर शेती पंपांसाठी अनुदानित रकमेवर शेतकऱ्यांना सौर पंपसेट वितरित केले जात आहेत. सौमित्र यांच्या संकेतस्थळावर निपाणी विभागातील सदलगा येथे १४ गावांचा समावेश आहे. या गावांचे फॉर्म न भरल्याने सर्व्हे नंबरमधील हिस्सा नंबर ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नितीश पाटील यांना देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
निवेदनातील माहिती अशी, सौरमित्र वेबसाईटवर सदलगा भागातील बारवाड, बेडकीहाळ, भोज, बोरगाव गळतगा, हुन्नरगी, कारदगा, कसनाळ, कुन्नूर, ममदापूर (के. एल.), मानकापूर, मांगुर चांद शिरदवाड, सिदनाळ या गावांचा समावेश आहे. सर्वे नंबरमधील हिस्सा नंबर ओपन होत नसल्याने वरील १४ गावातील शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
ऊसाच्या शेतात विद्युत वाहिन्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जळलेल्या ऊसाच्या नुकसान भरपाईसाठी जैनवाडी, बेनाडी, मानकापूर येथील शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही.
साखर कारखान्याकडून प्रति टन ३५०० आणि सरकारकडून २००० असे ५५०० मिळाले पाहिजेत. महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांप्रमाणेच कर्नाटकातील कारखान्यांनीही दर द्यावा, यासह विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ सौरमित्रसह शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शशिकांत नाईक, चुन्नापा पुजारी, प्रकाश नाईक, एस. के. पाटील, संजय पोवार, सागर पाटील, सुभाष शिरगुरे, विश्वनाथ किल्लेदार, मल्लिकार्जुन वाली, दुंडाप्पा कमते, सुरेश परगन्नावर, त्यागराज कदम, संजु हवन्नावर, आशा एम. वासु पंडरोळी, किसन नंदी, राघवेंद्र नाईक, बाबासाहेब पाटील, मयूर पोवार, आप्पासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *