Tuesday , March 3 2026
Breaking News

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये कन्नड व मराठी एलकेजी युकेजी‌‌, पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आर. पी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून स्तवनिधी पी. बी. आश्रमचे संचालक महावीर पाटील, सन्मती विद्यामंदिरचे उपाध्यक्ष नेमिनाथ मगदूम, स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील, सन्मतीचे संचालक राजू पाटील उपस्थित होते.
नवीन प्रवेश झालेल्या लहान मुलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन वर्गखोल्यांचे उद्घाटन झाले. सर्व लहान बालकांना बसवून “श्री”चे लेखन करून या नूतन शैक्षणिक विभागाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी स्वागत केले. संस्थेचे संस्थापक गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या तैल चित्रासमोर पाहुणे व पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. महावीर पाटील यांनी, एलकेजीचे लहान रोपटे निश्चितपणे मोठे होईल. चांगले शिक्षण या ठिकाणी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आर. पी. पाटील यांनी, शिक्षणाचे महत्त्व पालकांना सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आशिष खोत, अनिल कलाजे, रुद्रगौडा पाटील, एस. बी. बेळगुदरी, एस. एन. रायनाडे, शितल मगदूम, ए. बी. नेजे, दादा मगदूम, त्रिवेणी पाटील, मयुरी जाधव यांच्यासह सिदनाळ, हुनरगी, बोळेवाडी, जैनवाडी, आडी परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व कर्मचारी उपस्थित होते. व्ही. बी. पाटील यांनी स्वागत केले. पी. एम. तोटद यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *