निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच शालेय प्रतिनिधींची निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया आधुनिक पद्धतीची ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने पार पाडली.
नूतन मराठी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांच्याकडे विद्यार्थ्यांनी अर्ज सुपूर्द केले. अनामत रक्कम, अर्जाची छाननी, अर्ज माघार, पात्र उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी निवडणुकीचा प्रचार, आचारसंहिता पाळणे ही सर्व प्रक्रिया करून घेतली. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र, आधार कार्ड दाखवून ईव्हीएम मशीनवर मतदान केले.
संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षा अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्यास प्रोत्साहन दिले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, वेंकटेश्वरा पी. यु. कॉलेजचे उपप्राचार्य एम. डी खोत, यू. आर. पवार, आर. एस. चव्हाण, व्ही. बी. पाटील, एस. बी. पवार, एस. आय. किवडा, यु. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ, एस. एस. कुलकर्णी, एस. पी. जगदाळे, एस. के. जोशी, ए. एम. कुंभार, यु. एम. पाटील निवडणुक प्रक्रियेत सहभागी झाले होते.