दत्तात्रय लवटे : पुस्तक वितरण कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : थोर व्यक्तींचे चरित्रे आपणास प्रेरणेनेसह जगण्याची दिशा दाखवतात. पुस्तक वाचताना आपण स्वतःला हरवून जातो. तर पुस्तक वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास होतो, हे स्पष्ट करून ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर कसा करावा व नोंदी कशा ठेवाव्यात पुस्तके कशी हाताळावी हे स्पष्ट केले. आप्पाचीवाडी येथील मराठी शाळेत इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन युनायटेड किंगडम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक वितरण कार्यक्रमात मुख्याध्यापक लवटे बोलत होते. अध्यक्षस्थान हालशुगरचे माजी संचालक आर. एम. खोत तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास डांगे, बी. एस. हेरवाडे उपस्थित होते.
प्रवीण भोसले यांनी प्रास्ताविक केले. विनायक गुरव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सुकुमार वंजोळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. डांगे यांनी, वाचाल तर वाचाल या उक्तीला अधोरेखित केले. मुलांना पुस्तक वाचन करण्यास परावृत्त केले. मुलांना पुस्तक वाचना करिताचे वेळापत्रक घालून दिले. पुस्तक वाचनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शिक्षकांनी देखील ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून त्यांचा संदर्भ मुलांना अध्यापन करताना देण्याचे आवाहन केले. आर. एम. खोत यांनी, या शाळेची निवड केल्याबद्दल अतिथींचे ऋण व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रमुख पंडित श्री. श्री. रविशंकर यांच्या माणसांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ध्यान, योग आचार -विचार अशा प्रकाश वाटा निर्माण केल्याचे सांगितले.
यावेळी पुस्तकांच्या दुनियेत जाऊन ग्रंथालयातील पुस्तकांचे उद्घाटन करून ती पुस्तके वाचनाकरता मुलांना खुली करून देण्यात आली.
कार्यक्रमास सुकुमार वंजोळे सोहन खोत, बापूसो पुजारी, अर्जुन कुंभार, विनोद माने, एस. डी. एम. सी. कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव हेलाटे, सदस्य विशाल पटेकर यांच्यासह एसडीएमसी सदस्य मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.