Monday , December 8 2025
Breaking News

बोरगाववाडीतील मोहरमला ५०९ वर्षाची परंपरा

Spread the love

 

मंगळवारी मुख्य दिवस ; गावात मुस्लिम बांधव नसताना उत्सव

निपाणी (वार्ता): निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावात एकही मुस्लिम समाज बांधव वास्तव्यास नसताना लिंगायत व इतर समाजातर्फे मोहरम सण साजरा केला जातो. या सणाला शुक्रवार (ता. १२) पासून प्रारंभ झाला आहे. बुधवार (ता. १७) अखेर
चालणाऱ्या या सणाचे यंदाचे ५०९ वे वर्ष आहे.
बोरगांववाडीचा मोहरम बेळगाव जिल्ह्यात आदर्शवत मानला जात असून कर्नाटक-महाराष्ट्रात लोकप्रिय ठरला आहे. खाईत कुदळ मारून सणाला प्रारंभ झाला आहे. तेथून पाचव्या दिवशी सकाळी मानक-यासह ग्राम अभिषेक होऊन देवाच्या सवाऱ्या रंगीबेरंगी पोशाखाने सजवण्यात आल्या. त्यानंतर लेजिमच्या निनादात सवाऱ्या गावचावडी मधून मिरवणुकीने भोसले (माने) गादीला प्रथम दर्शनासाठी गेल्या. तेथून पुन्हा देव गावचावडी मंदिरात विराजमान करण्यात आल्या. देव बसल्यानंतर पहिल्या दिवशी नालपिर करबल व विश्वनाथ करबल मेलच्या दंगली होणार आहेत.

सातवीच्या कंदुरी पासून दंडवत व नैवद्य नारळ चढविण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता.१६) खत्तल रात्र मोहरमचा मुख्य दिवस आहे. या दिवशीही दंडवत आणि नैवेद्य होणार आहेत. मध्यरात्री खाई खेळून करून देव भेटीसाठी मिरवणुकीने फिरविले जाणार आहे. बुधवारी (ता.१७) सकाळपासून गावातील पारंपारिक भरुड सोंगे काढून यात्रेकरूंचे मनोरंजन व देवाची चाकरी होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता देव विसर्जनासाठी गाय विहीर मार्गाने जाणार असल्याची माहिती बोरगाववाडी ग्राम पंचायत अध्यक्षा गीतांजली विजय माने यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *