रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या वाहनासह रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोल माफी व्हावी, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी जिल्हाधिकारी रोशन बेग यांना निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, राज्यात दुष्काळ असताना सरकारने शेतकऱ्यांना पुरेशी भरपाई वाटप केलेली नाही. हे त्वरित दुरुस्त करावी. शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावी. स्वामिनाथ आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त भाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच्या सरकारच्या विविध योजना सतत चालू ठेवाव्यात. शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी. रोजगार हमी योजना पूर्णपणे शेतीसाठी लागू करावी. मातीच्या सुपीकतेसाठी कृषी विभाग मजबूत करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. राज्यातील सर्व सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात. आरोग्य आणि शिक्षण श्रेणी सुधारित केली पाहिजे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सुरेश परगन्नावर, किसनना नंदी, महेश सुभेदार, रमेश वाली, गंगाधर मेटे, राहुल कुबकड्डी, पांडू बिरनगड्डी, वासु पंडरोळी, अण्णा मादर, मल्लप्पा दुकान, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, कुमार पाटील, आप्पासाहेब पाटील, विश्वनाथ किल्लेदार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta