निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कुटुंबियांची परिस्थिती पूर्णतः हलाखीची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.
पाटील व चिंगळे यांनी व्हटकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. मयत तिरुपती व्हटकर हे जनावरांसाठी लागणाऱ्या दोऱ्यासह इतर वस्तू तयार करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री या जखमी झाल्या आहेत. पाटील व चिंगळे यांनी याबाबत संबंधित खात्यासह अधिकार्याशी याबाबत संपर्क साधला. यावेळी नगरसेवक रवींद्र श्रीखंडे, युवराज पोळ, प्रशांत हंडोरे, किसन दावणे, कपिल पोळ, रामदास नारायणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta