राजू पोवार; पुणे येथे निर्धार मेळावा
निपाणी (वार्ता) : देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण शेतीमालाला योग्य भाव देण्यास देशातील सरकार असमर्थ ठरले आहे. या उलट खते, बी- बियाण्याचे दर वाढविले आहेत. भाजीपाल्यालाही योग्य दर दिला जात नाही. अतिवृष्टी, महापूर काळात केवळ सर्वे करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. पुणे येथील सदाशिव पेठ मधील एस. एम. जोशी श्रमिक पत्रकार संघटनेच्या भवनात विविध शेतकरी व सामाजिक संघटना तर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
रविकांत तुपकर म्हणाले, शेती व्यवसाय परवडत नसल्याने अनेकांनी शेतीला पूरक असे कोंबडी पालन, मत्स्यपालन, जनावरांचा गोठा असे विविध व्यवसाय सुरू केले आहेत. पण शासनातर्फे सवलती दिल्या जात नाहीत. याशिवाय ऊस, सोयाबीन कापूस अशा पिकांना हमीभाव मिळणे आवश्यक आहे. तरच शेतकरी जगणार असल्याचे सांगितले.
मेळाव्यासजय शिवराय किसान संघटनेचे आध्यक्ष शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, सदाशिव कुलकर्णी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शामसुंदर जायगुडे, शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष शितल कांबळे, शरद जोशी संघटनेचे उदयकुमार पाटील (डिग्रजकर) शर्वरी तुपकर. श, हिंगोलीचे गजानन कावरखे, बिडचे कुलदीप करपे, गजाभाऊ अहमदाबादकर, लातुरचे सत्तार पंढरपुरचे समाधान फाटे यांच्यासह २७ जिल्ह्यातील विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधीकारी उपस्थित होते.