निपाणी (वार्ता) : येथील विद्या संवर्धक मंडळ संचलित सी. बी. एस. ई. इंग्रजी शाळेतील प्राचार्या डॉ. समीरा फिरोज चाऊस यांनी पीएचडी पदवी मिळविली आहे. संस्थेतर्फे त्यांचा सीईओ डॉ. सिदगौडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. समिरा चाऊस यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात ‘ए स्टडी ऑन युटीलायझेशन ऑफ सोलार एनर्जी इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यामुळे त्यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी देण्यात आली. या यशासाठी त्यांना डॉ. पी. एस. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. निपाणी शहरातील मुस्लिम समाजामधील त्या पहिल्या महिला पीएचडी संपादन केलेल्या महिला प्राध्यापिका आहेत. शिक्षणा बरोबरच त्यांचा पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात महत्त्वाचा वाटा आहे. वृक्षसंवर्धन, जखमी पशु पक्षांना उपचार करून त्यांना परत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यासाठी त्या कार्य करीत आहेत. सृष्टी पर्यावरणवादी संघटनांच्या त्या संचालिका आहेत.
त्यांच्या सत्कार प्रसंगी प्रा. बाहुबली मगदूम, प्रा. पी. आय. मधाळे, प्रा. सी. आर. जोशी, प्रा. नितीन मुगडे, सुजाता बल्लोळ, प्रा. बागवान यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.