Wednesday , March 4 2026
Breaking News

निपाणीत ‘शिवशंभोचा’ गजर

Spread the love

 

पहिला श्रावण सोमवार; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

निपाणी (वार्ता) : यंदा बऱ्याच वर्षानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आला त्यामुळे निपाणी शहरासह परिसरातील शिव मंदिरे सोमवारी (ता.५) भाविकांनी फुलून गेली होती. शिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘हर हर महादेवाचा गजर सुरू होता. अनेक ठिकाणी दर्शनासाठी रांगा केल्याने भाविकांची चांगली सोय झाली.
येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात पहाटे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार व भाविकांच्या हस्ते पूजा व अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जपनाम कार्यक्रम झाला. सामूहिक आरती झाल्यानंतर मल्लिकार्जुन गडकरी आणि वज्रकांत सदलगे परिवारातर्फे भाविकांना शाबू खिचडी वाटप करण्यात आली.
मंदिराच्या बाहेर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शंकराचा १५ फुट देखावा सादर केला होता. शिवाय मंदिरासह बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
रात्री महादेव पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सुनील पाटील, अनिल पाटील, अमर बागेवाडी, चंद्रकांत तारळे, संजय मोळवाडे, हालशुगरचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, रवींद्र कोठीवाले, सदानंद दुमाले, रवींद्र शेट्टी, शिवकांत चंद्रकुडे, महादेव पाटील, बाबासाहेब चंद्रकुडे, रवींद्र चंद्रकुडे, राजेंद्र पाटील, संजय मोळवाडे, समीर बागेवाडी, महेश दिवाण, प्रमोद पणदे यांच्यासह निलंबिका महिला मंडळाच्या सदस्या, गणेश मंडळ, एस. पी. ग्रुप, महादेव पालखी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. येथील मंगळवार पेठेतील महादेव मंदिर, शिप्पूर रामलिंग मंदिरासह विविध ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *