Tuesday , September 17 2024
Breaking News

कोलकात्ता प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा; आयएमएची मागणी

Spread the love

 

निपाणीतील दवाखाने दिवसभर बंद

निपाणी (वार्ता) : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (ता.१७) निपाणी मेडिकल मेडिकल असोसिएशनतर्फे
निषेध रॅली काढण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता एक दिवस काम बंद ठेवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना देण्यात आले.
सकाळी १० वाजता आयएमए हॉलपासून निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. जुना पी. बी. रोड, निपाणी मेडिकल, अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा चौक, नगरपालिका मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. राजेश बनवन्ना व मान्यवरांच्या हस्ते तहसीलदार कारंडे यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बनवन्ना यांनी, कोलकत्ता मधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना टाळण्यासाठी न्यायव्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. शिवाय सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. अशा प्रकरणात दोषी व्यक्तीवर कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप टाळण्याचे आवाहन केले.
डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी, वैद्यकीय मंडळीवरील आल्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे. सरकारने याबाबत कडक कायदा करून डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. माजी सभापती जुबेर बागवान, प्रा. कांचन बिरनाळे पाटील त्यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बसवराज कऱ्यापगोळ, उपाध्यक्ष डॉ. नितीन शहा, सचिव डॉ. अभिषेक माने, डॉ. उत्तम पाटील, डॉ. अभिषेक चौगुले, डॉ. अरुण पाटील, डॉ. सुनील ससे, डॉ. दीपक देशपांडे, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. पवन रुतन्नावर, डॉ. पंकज देशमाने, डॉ. शितल शेट्टी, डॉ. धरणगुत्ते, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. राहुल निर्मळे, डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. संगीता देशपांडे, डॉ. सुनिता देवर्षी, डॉ. आप्पासाहेब जनवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *