वैशाली पाटील : कुर्लीतील वक्तृत्व स्पर्धेत शिरोळची ’शांभवी’प्रथम
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गेली 13 वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भविष्यात चांगले वक्ते निर्माण करण्यासाठी आशा स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतात, असे मत मुंबई येथील वैशाली पाटील यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात ’ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रष्ट मुंबई’ पुरस्कृत दिवांगत बाळाराम पाटील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन मुंबई येथील वैशाली पाटील बोलत झाल्या.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत बाळाराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. आनंद पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी अष्टपैलू बनण्यासाठी व आपल्यामधील सुप्तगुणांचा विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
बस्तवडे येथील मधुकर भोसले यांनी स्पर्धेच्या नियमावली व वक्तृत्व कला विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्यावतीने वैशाली पाटील व डॉ. आनंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत शांभवी श्रीकांत माळकर-पदमराजे गर्ल्स हायस्कूल, शिरोळ- प्रथम, प्रतीक्षा सुरेश येरुडकर-खोराटे हायस्कूल सरवडे- द्वितीय, भावना नंदकुमार भोई-टी एएन हायस्कूल नांदणी- तृतीय, श्रुती शिवाजी शित्रे-सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली- चतुर्थ आणि राजवर्धन दिपक भोसले किसनराव मोरे हायस्कूल-सरवडे यांने पाचवा क्रमांक पटकावला.
तर निनाद दिपक यादव- आर के हायस्कूल-सातारा यांने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मधुकर भोसले-बस्तवडे, ए. एम. माने-कुर्ली, ए. ए. चौगुले-चिखली, डी. डी. हाळवणकर -निपाणी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापक बी. एस. पाटील, उद्योजक रविंद्र चौगुले यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमोद पाटील, किरण निकाडे, अमोल माळी, किरण पाटील, के. आर. वाळवे, बबन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस. ए. पाटील, एस. एस. साळवी, यु. पी. पाटील, एस. जी. लिंबिगीडद, आर. आर. मोरे, विजय साळुंखे यांनी परिश्रम घेतले. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. तर टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …