राजू पोवार; भाग्यलक्ष्मी संस्थेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. शिवाय दिवसेंदिवस शिक्षण महागडे बनत चालले आहे. तरीही नोकरी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
जत्राट येथील भाग्यलक्ष्मी संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पोवार म्हणाले, पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. त्याचा लाभ घेऊन वेळेत कर्ज भरल्यास संस्था आणि शेतकऱ्यांची प्रगती होत असल्याचे सांगितले. वक्तृत्व स्पर्धेत परितोष पाटील -नांगनूर, मधुरा कुंभार-आडी, धनश्री संकपाळ -पडलीहाळ, आर्यन खोत -बोरगाववाडी, आराध्या खेडे-अनुर यांनी प्रथम ते पाचव्या क्रमांकाची बक्षिसे पटकावली.
यावेळी संस्थेचे चेअरमन सचिन कोले, सेक्रेटरी अमित चौगुले, सुनील वाघमारे, बाबासाहेब कोकाटे, काकासाहेब पाटील, सुधाकर पाटील, आकाश रानमाळे, सागर हरदारे, विजय जबडे, अमित खोत, विशाल जबडे, अरुण रेंदाळे, राहुल जबडे, महादेव तावदारे, काशिनाथ जगदाळे, किरण जोके, दत्ता धारकाडे, प्रशांत पाटील, सौरभ रामपुरे उपस्थित होते.