Tuesday , September 17 2024
Breaking News

समडोळीत गुरुवारी शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

Spread the love

 

वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील; विविध कार्यक्रमांचे आयोजन

निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य, चरित्र्यचक्रवर्ती, समाधी सम्राट १०८ आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव समडोळी येथे गुरुवारी (ता.५) होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली.
बोरगाव येथे कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, शांतीसागर महाराज यांचे पावन पवितत्र्य, स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना आभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिसा, त्याग, तपस्या, संयम यासारख्या सदविचारांची समाजात अभिस्मरण व्हावे, हा मुख्य हेतू ठेवून पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी कार्यक्रमासाठी सप्तमा पट्टाधीश १०८ अनेकांत सागर महाराज, १०८ वर्धमान सागर महाराज, स्वस्तीश्री जीनसेन भट्टारक स्वामी, लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे अध्यक्षस्थानी भालचंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांती सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते व सांगली पोलीस अधीक्षक संदीप दुगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. आरोग्य शिबिर, शांती कलश प्रवर्तन, वृक्षारोपण, कृषी प्रदर्शन, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, पाठशाला वकृत्व नृत्य, मंगलाष्टक पाठांतर स्पर्धा, शांतीदीप प्रज्वलन, विश्वशांती प्रार्थना, ध्वजारोहण व शांती कलशाचेस्वागत असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, सन १९८२ साली बाबासाहेब कुचनुरे यांनी स्थापन केलेल्या वीर सेवा दल आज जैन समाजात संस्कार, व्यसनमुक्त व शिक्षणाला महत्त्व दिले आहे. दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून वीर सेवा दल कार्य करीत आहे. समडोळी येथे होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातील श्रावक, श्राविका उपस्थित राहणार आहेत. दादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजन होत होते. यापुढेही आपण अरिहंत व पाटील परिवाराचे सहकार्य लाभणार असल्याचे सांगितले. बैठकीस अभयकुमार करोले, राजेंद्र पाटील, राजू मगदूम, अभयकुमार मगदूम, अशोक पाटील, बाबासो वठारे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *