निपाणीत गोविंदांचा थरार; रात्री उशिरापर्यंत गर्दी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि येथील चाटे मार्केट मधील व्यापारी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ‘गो, गो गोविंदा…’ म्हणत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाच्या गोविंदांनी थरावर थर, रचण्याची त्यांची चुरस निपाणीकरांना अनुभवता आली. ही दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाने फोडली त्यांना बोरगाव येथील पीकेपीएसचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
या दहीहंडीमध्ये घट्टे गल्लीतील नवभारत गोविंदा पथकाने चार थर रचून सलामी दिली. संकेश्वरच्या भगतसिंग गोविंदा पथकाने पाच थर रचून दहीहंडीला सलामी दिली. तर चाटे मार्केट मधील गोविंदा पथकाने चार थरावरून सलामी दिली. वरील तिन्ही गोविंदा पथकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन झाले.
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, दत्ता नाईक, संजय पावले, शेरू बडेघर, विनायक वडे, सुनील शेलार, दिलीप पठाडे, इम्रान मकानदार, निरंजन पाटील- सरकार, अमर शिंत्रे, रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला, मंडळाचे अध्यक्ष सुजित देसाई -सरकार, उपाध्यक्ष अतुल शिंदे, अल्ताफ हज्जुखान, अन्वर बागवान, इरफान महात, अथर्व चंद्रकुडे, अब्बास फरास, अक्षय आंबले, विनायक शिंदे, आकाश माने, आप्पासाहेब शिरगावे, विशाल घोडके, अनिल फुटाणकर, पांडुरंग भोई, ओंकार शिंदे, उपस्थित होते.
—————————————————————–
पुढील वर्षी १ लाख २१ हजाराची दहीहंडी
सहकारत्न उत्तम पाटील यांनी, अरिहंत उद्योग समूहातर्फे नेहमीच कला, क्रीडेला वाव दिला आहे. युवा पिढीने भारतीय संस्कृती, खेळ जोपासले पाहिजे. पुढील वर्षी १ लाख २१ हजार रुपयाच्या दहीहंडीची घोषणा केली.