Tuesday , September 17 2024
Breaking News

सलीम नदाफ यांच्या विज्ञानवारी शनिवारी नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेतील विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांच्या ‘विज्ञानावरी शनिवारी’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पुणे येथील एस. सी.ई.आर.टीच्या सहाय्यक संचालिका शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या शैक्षणिक परिषदेत देशभरातील दोनशे शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करत असतात. त्यांनी राबविलेल्या नवोपक्रमाची माहिती देशातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना व्हावी. सर्व स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजित केली जाते. विज्ञानवारी शनिवारी या सलीम नदाफ यांच्या नवोपक्रमाची देशभरातून आलेल्या नवोपक्रमातून निवड झाली आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी अशा चार गटांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम नवोपक्रम निवडले गेले.
यावेळी सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, जीवन शिक्षण मासिकाचे निर्मिती अधिकारी संजय जगताप, बीड जिल्हा डायटचे प्राचार्य इब्राहिम नदाफ, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले उपस्थित होते.
नदाफ यांना निपाणीच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बी. आर. सी प्रमुख राजू कागे, माजी सी.आर.सी प्रमुख महादेव बन्ने, संभाजीनगर शाळेचे माजी मुख्याध्यापक डी. बी. माने, मुख्याध्यापक सी. एम. सुगते, एस.डी.एम.सी चे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. भोज हायस्कूलचे विज्ञान शिक्षक दिलीप शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *