कमल चौगुले; कुर्लीत झिम्मा, फुगडी स्पर्धा
निपाणी (वार्ता) : आजच्या धावत्या युगात भारतीय संस्कृतीचा वारसा सणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे शक्य आहे.भारतीय सण उत्सवांची रचना ही सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी केली आहे, असे मत निलगंगा महिला मंच अध्यक्षा कमल चौगुले यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथील एच जे सी चीफ फौंडेशनतर्फे आयोजित ईनामदार फिरता चषक झिम्मा फुगडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजगिरी मठाचे सुदर्शन गिरी महाराज होते.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सुदर्शन गिरी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन झाले. निलगंगा महिला मंचच्या सेक्रेटरी ज्योती चौगुले यांनी स्पर्धेचे नियम व स्वरूपाची माहिती दिली. कोल्हापूर व बेळगाव जिह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेवून त्यांनी फुगडी, झिम्मा, काटवटकाना,घोडा, सूप नाचवणे, घागर अशा पारंपारिक खेळां बरोबर प्रबोधन गीतांचे सादरीकरण केले.
स्पर्धेत ज्ञानेश्वरी माऊली ग्रुप (चंद्रे), गोसावी नंद सखी संघ (वडरगे गडहिंग्लज), धनलक्ष्मी महिला संघ (पांडेवाडी राधानगरी), नागनाथ महिला मंडळ(सोनाळी), हिंदवी महिला संघ (शिंदेवाडी) तर उत्तेजनार्थ कन्या ग्रुप (हदनाळ), भावेश्वरी महिला मंच (करड्याळ), झाशीची राणी महिला संघ (शेंडुर) या संघांनी बक्षिसे मिळवली. उखाणा स्पर्धेत आरती कोळी (चंद्रे), अश्विनी बोडके (शेंडुर),सविता गुरव( व्हन्नूर) राणी वंदूरे यांनी बक्षीसे पटकाविली. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
एम. बी. खिरुगडे, ए. एम. अमृतसमन्नावर, ए. ए. चौगुले यांनी परीक्षण केले. यावेळी यशोदा चौगुले, सुवर्णा चौगुले, सुनीता चौगुले, वासंती बोंगारडे, लतिका चौगुले, सीमा चौगुले, आकांक्षा रेडेकर, बी. जी. चौगुले, शिवाजी चौगुले, उमेश दिंडे, डी. एस. चौगुले, प्रभाकर नाईक, लक्ष्मण चौगुले, गुरु निकाडे सीताराम चौगुले, शामराव चौगुले, अक्षय पाटील, सुभाष चौगुले, संजय चौगुले, आप्पासाहेब पाटील, विजय चौगुले, शैलेश बोंगारडे उपस्थित होते. ऋतुजा चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. तर वैष्णवी चौगुले यांनी आभार मानले.