Tuesday , March 3 2026
Breaking News

कोगनोळी आरटीओवर लोकायुक्ताची धाड

Spread the love

 

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी आरटीओ ऑफिस वर लोकायुक्त यांच्यावतीने धाड टाकून कागदपत्रासह इतर तपासणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी आरटीओ ऑफिस वर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त यांच्या वतीने मंगळवार तारीख 8 रोजी पहाटे धाड टाकण्यात आली. अचानक लोकायुक्तांच्या धाडीमुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळा उडाली.
यावेळी बोलताना लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय आयपीएस यांनी कोगनोळी आरटीओ ऑफिस वर कागदपत्राची तपासणी सुरू असून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक हनुमंत राय यांच्यासमवेत सुमारे 15 लोकायुक्त कर्मचारी या कारवाईमध्ये उपस्थित होते.
लोकायुक्त कारवाई झाल्याने आरटीओ ऑफिस वर शुकशुकाट पसरला होता.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *