निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील समाजसेवी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संजय पंत व डॉ.श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे चिरंजीव डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांची पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षणसाठी ‘ऑल इंडिया कौन्सिलिंग’ मधून पहिल्या फेरीत एम.डी. मेडिसिन प्रशिक्षणसाठी वर्धा (नागपूर) येथे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे.
डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांचे वैद्यकीय एमबीबीएस शिक्षण मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. रुग्णालय येथे झाले आहे. प्राथमिक शिक्षण निपाणी व पदवीपूर्व शिक्षण राजस्थानमधील ॲलन कोटा येथे झाले आहे. आजवरचे संपूर्ण शिक्षण उच्च गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
अक्कोळ गावातील डॉ. पंतबाळेकुंद्री घराण्यातील चौथी पिढी सुद्धा वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत पुढे चालवेल आणि श्रीपंतघराण्याचा गौरव नव्या उंचीवर नेईल अशी आशा व्यक्त होत आहे. निखिल यांचे वडील डॉ. संजयपंत बाळेकुंद्री यांनी सतत महापूर आणि कोरोना काळात शहर आणि ग्रामीण भागात जाऊन मोफत वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे देवदूत म्हणून त्यांचा या परिसरात नावलौकिक आहे.
ग्रामीण भागातून डॉ. निखील यांच्या एम.डी.(मेडिसिन) प्रशिक्षणसाठी निवड झाल्याने अकोळ आणि निपाणी परिसरात कौतुक होत आहे.