आकाश माने; पुरुषासह महिलांचाही सहभाग
निपाणी (वार्ता) : निपाणी व परिसरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत व्हावा, गडकोटांबद्दल आदर निर्माण होण्यासाठी येथील मावळा ग्रुप गेल्या चार वर्षापासून गडकोट मोहिम आयोजित करत आहे. यावर्षी मावळा ग्रुपची चौथी गडकोट मोहीम आहे. ही मोहीम निपाणी ते किल्ले पुरंदर अशी पार पडणार आहे. या मोहिमेत महिला पुरुष सहभागी होऊ शकत असल्याची माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली. सोमवारी (ता.२) आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी खजिनदार राहुल सडोलकर भाटले यांच्यासह संचालक उपस्थित होते.
आकाश माने म्हणाले, मावळा ग्रुप गेली चार वर्षे निपाणी सह परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिवर्षी महिला, बालचमु व पुरुषांना गडकोट मोहीम घडवणे हा उपक्रम हाती घेतला आहे. मागील तीन मोहिमांना निपाणी व परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. पहिल्या वर्षी मोहीम किल्ले प्रताप गड व रायगड येथे पार पडली होती. यानंतर किल्ले सज्जनगड व किल्ले राजगड अशी मोहीम पार पडले तर तिसऱ्या वर्षी वढू बुद्रुक, लेण्याद्री व किल्ले शिवनेरी अशी मोहीम पार पडली. यावेळी महिला, शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित झाले होते.
गडकोटावर जाऊन तेथील इतिहास जाणून घेणे, स्वच्छता मोहीम राबवणे, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करणे, त्या सोबत व्याख्यानाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सर्वांना पोचवणे असे कार्य मोहिमेत सुरू असते. यावर्षी चौथी गडकोट मोहीम आयोजित करण्यातल आली असून ही मोहीम किल्ले सिंहगड किल्ले मल्हारगड व किल्ले पुरंदर अशी पार पडणार आहे. त्यामुळे मागील तीन मोहिमांना नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षीही या मोहिमेचा लाभ घ्यावा.गेल्यावर्षी महिलांची संख्या लक्षणीय असल्याने मावळा ग्रुपच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळाले आहे. यावर्षी जास्तीत जास्त महिलांना गडकोट दर्शन घडवणे हा हेतू आहे. त्यामुळे महिलांनी आवर्जून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन माने यांनी केले.
——————————————————————
मोहिमे सहभागी होणाऱ्या प्रत्येक मावळ्यांना ग्रुपकडून पोशाख प्रवासाची व्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात येत असते त्याचबरोबर गडावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.