काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेतील १९९२-९३ सालातील १०च्या वर्गमित्रांची तब्बल ३१ वर्षानी शाळा भरली. यावेळी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्गाला त्यावेळी शिकवणारे १२ गुरुजन व ७० विद्यार्थी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी होते.
रमेश पाटील यांनी स्वागत तर अभिजीत जिरगे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवर व गुरुजनांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. निवृत्ती शिक्षकांनी मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवृत्त शिक्षक बी. एन. इंगळे, जे. आर. जनवाडे, बी. एस. मालगार, आर. जे. सोलापुरे, एम. ए. जमदाडे, डी. एस. किल्लेदार, एम. एम. पाटील, एस. एस. संकपाळ, ए. बी. बसर्गे या गुरूजनांची माजी विद्यार्थीनींकडून पाद्यपूजा करण्यात आली.
माजी विद्यार्थीनी शालेय जीवनातील आठवणी, गंमती,जमती, गोड क्षण सर्वा समोर मांडले. त्यानंतर वर्ग भरवून शिक्षकांनी पुन्हा एकदा ज्ञानदान केले.
यावेळी अंताक्षरी, संगीत खुर्ची, गायन, कवन, असे वेग-वेगळे खेळ स्पर्धा घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली. अपर्णा चौगुले यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश खोत, राजेंद्र हळीज्वोळे, किरण बम्मणगे, सातगोंडा बागेवाडी, विश्वास लठ्ठे, नामदेव हरेर, भरमा जाधव शश्मिता तावदारे ललिता मगदूम यांनी परिश्रम घेतले. यावेळी निवृत्त शिक्षकासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.