विविध मंडळातर्फे जयंती : सामाजिक उपक्रमांवर भर
निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा विविध सामाजिक व समाजउपयोगी आयोजन कार्यक्रमाचे करण्यात आले होते. निपाणीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारी (ता. १९) सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. तालुकास्तरावरही शिवजयंतीनिमित्त उत्साह पाहावयास मिळाला. यानिमित्त संपूर्ण शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात समस्त मराठा समाजातर्फे सामाजिक कार्यकर्ते गजानन शिंदे यांच्या हस्ते शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, युवा उद्योजक रोहन साळवे, नगरसेवक संजय सांगावकर, राजेश कदम, सुधाकर सोनाळकर, नवनाथ चव्हाण, अरुण आवळेकर, इंद्रजीत जामदार, संदीप इंगवले, बाळासाहेब कामते, सचिन पोवार, शीतल भाटले, बाळासाहेब प्रा. सूर्यवंशी, ओमकार शिंदे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळ
येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी मंडळातर्फे शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गोपाळ नाईक यांचे हस्ते मुर्ती पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष उदय शिंदे यांनी तारखेनुसार किंवा तिथीनुसार प्रत्येक शिवप्रेमींनी आपल्या घरी सहकुटुंब शिवजयंती साजरी केली पाहीजे. मुलांसह महिलांना यात मध्ये सामिल करून त्यांना इतिहास समजविण्याचे आवाहन केले.
यावेळी संचालक संजय माने, बाळासाहेब जासुद, चेतन शिंदे, ओंकार रविंद्र शिंदे, अभिजीत कागीनकर, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक बाळासाहेब देसाई, बाळासाहेब सुर्यवंशी, सुभाष कदम, बापू वारके, सुनिल कांबळे, बाळु मोरबाळे, प्रताप पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत साध्या आणि मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येत होती. परंतु यंदा कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे या उत्सवाला काही प्रमाणात भव्य स्वरूप आले होते. प्रशासनाने निर्बंध आणि सुरक्षितता पाळून शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे काही प्रमाणात शिवभक्तांना दिलासा मिळाला. त्यामुळे शिवभक्तांचा उत्साह दिसून येत होता. प्रत्येक चौकाचौकात भगवे ध्वज लागले आहेत. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती खरेदी करण्याकडेही शिवभक्तांचा यंदा ओढा दिसून आला. जयंतीनिमित्त थाटलेल्या दुकानामध्ये विविध आकारांतील भगवे ध्वज, टी शर्ट, किचन, फोटो फेम, टोपी असे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्येही उत्साह पाहायला मिळतहोता. ग्रामीण भागातही सामाजिक उपक्रम तसेच प्रबोधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे जल – दुग्धाभिषेक पूजन तसेच पोवाडेचे आयोजन करण्यात आले. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून अनेक निर्बंधही शिथिल करण्यात आले होते.
यंदा ध्वजविक्रीत वाढ
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे प्रतिबंध असल्यामुळे शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली नव्हती. परंतु यंदा काही प्रमाणात सूट मिळाल्यामुळे त्या तुलनेत भगवे ध्वज विक्रीमध्ये वाढ झाली आहे. निपाणी शहरात साखरवाडी, अशोकनगर, दलाल पेठ, चाटे मार्केट, बेळगाव नाका आणि
इतर ठिकाणी ध्वज खरेदीसाठी शिवभक्ता सह युवकांची झुंबड पहावयास मिळाली.