नूतन मराठी विद्यालयमध्ये पाककला स्पर्धा; ४८ विद्यार्थ्यांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ व शिक्षण संयोजक सदाशिव तराळ उपस्थित होते.
मुख्याध्यापक विनायक बाचणे स्वागत यांनी केले. स्पर्धेमध्ये शाळेतील ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. पिठलं भाकरी, ढोकळा, समोसा, आंबोळी, उत्ताप्पा, पॅटीस, भजी, कोथिंबीर वडी, मोदक, व्हेज बिर्याणी, केक, फ्रुट सॅलेट, धपाटे, गुलाबजाम, थालीपीठ असे अनेक स्वादिष्ट प्रकार विद्यार्थ्यांनी बनवून आणले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी एम. डी. खोत, यु .आर. पवार, एस. बी. पवार, एस. आय. किंवडा , ए.एम. कुंभार, आर. एस .चव्हाण, व्ही .बी. पाटील, यु. एम. पाटील,एस. के. जोशी एस. एस .कुलकर्णी, एस. पी .जगदाळे, एस .आर .संकपाळ, यु. एम. आवटे, आर. पी. पाटील, एस. ए. रावळ उपस्थित होते.
—-