निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कराड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड आणि रायगड या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. दोन दिवसांच्या या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, निसर्ग, आणि संस्कृतीचा अभ्यास करत ज्ञानात भर टाकली.
वाई येथे ऐतिहासिक मंदिरांच्या दर्शनाने विद्यार्थ्यांना प्राचीन स्थापत्यकलेची ओळख झाली. पाचगणी आणि महाबळेश्वर येथे निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घेतला. प्रतापगडावर शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणादायी गाथा विद्यार्थ्यांनी ऐकली. रायगडावर शिवकालीन वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले.
या सहलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, आणि शिक्षक एन. टी. खराडे व ए. एन. केसरकर यांनी केले. सहली दरम्यान शिस्तबद्ध वेळापत्रकाचे नियोजन क्रीडा शिक्षक एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
मराठा मंडळ अध्यक्ष रवींद्र कदम, शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश कदम, मार्गदर्शिका संगीता कदम, आणि संचालिका ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वीरीत्या पार पडली. जे. पी. डंगे, एस. बी. कांबळे, पी. एस. घाटगे, व्ही. एस. बुरुड, एस. एस. मोरे, पी. पी. पाटील आणि एम. ए. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.