
निपाणी : लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगुड यांच्यावतीने, मा. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव, सीमाभाग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेळगाव सीमाप्रश्नाच्या दिर्घ अंदोलनाला नव्याने चालना देण्यासाठी आणि या अंदोलनामध्ये नवयुवकांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यासाठी नुकतीच हुतात्मा स्मारक, हिंडलगा येथे सदर म. ए. युवा समिती सीमाभाग या शिखर समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती लक्ष्मीकांत पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली. तर संजयदादा मंडलिक यांनी, संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची आणि सीमाप्रश्नासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सुखदेव येरुडकर, भूषण पाटील, दादासो लवटे, नामदेव मेंडके, चौगुले, जयसिंग भोसले, राहुल शिंदे, दीपक परीट, पिंटू पाटील, दयानंद खतकर, सागर देसाई, आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta