निपाणी : निपाणी येथील केएलई सोसायटीच्या इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कुमारी मालविका पुनम संदीप चिकोडे हिला सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचा “बेस्ट गर्ल ऑफ द इयर” हा अवॉर्ड केएलई बोर्डाचे सदस्य माननीय श्री. प्रवीण अशोकआण्णा बागेवाडी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कुमारी मालविका हिने या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमा बरोबरच सांस्कृतिक, क्रीडा, नृत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये यश मिळवुन शाळेचे नाव उज्वल केले आहे. यासाठी तिला प्राचार्य श्री. पी. आय. पाटील व शाळेतील सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कुमारी मालविका चिकोडे हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta