गुलमोहर’कविता संग्रहाचे प्रकाशन
निपाणी (वार्ता) : कुशापराव पाटील यांच्या कविता सर्वसमावेशक आहेत. कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे चित्रण केले म्हणूनच त्यांच्या कविता वाचनीय ठरले आहेत. त्यामधील स्त्रीभ्रूणहत्या या प्रश्नावरच्या कवितेमुळे अनेकांचे मन परिवर्तन झाल्याचे मत प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केले.कुशापराव पाटील यांच्या ‘गुलमोहर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन निसर्ग लॉ मध्ये पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदराव पाटील होते.
सुभाष चोपडे यांनी स्वागत तर डॉ. शिल्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी, कवी जरी स्वतःच्या सुखासाठी लिहीत असला तरी त्याला रसिकांची दाद मिळणे आवश्यक असते. कुशापराव पाटील यांनी लिहिलेल्या गुलमोहर या कथासंग्रहाला प्रथम त्यांच्या कुटुंबीयांकडून दाद मिळाली. आता रसिकांच्या भेटीला हा कविता संग्रह आल्याचे सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील, उज्ज्वला गुंजकर,
आर. के. पाटील, शामराव पुंडे, विठ्ठल घोरपडे, सुषमा पाटील, ओंकार पाटील मधुकर भोसले यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास युगांतरा कदम, प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. अरुण हळदीकर, गीतांजली पाटील, राजमती पाटील, डॉ. एन. डी. जत्राटकर, प्रा. एम. ए. नाईक, राजाराम पाटील, रावसाहेब पाटील, संगीता पाटील, कबीर वराळे उपस्थित होते. डॉ. अमृत पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta