नूतन मराठी विद्यालयात आठवडी बाजार
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरून त्यामध्ये भाजी आणली आणि विकलीही. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, वह्या पेन खाद्यपदार्थ आणले होते.या बाजाराला पालकासह परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या ए. सी. धुमाळ यांच्या हस्ते चिमुकल्यांच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी शंभरहून अधिक स्टॉल लावले होती. त्यामध्ये वांगी, बटाटे, दोडका, शेंगा, पालेभाज्या, कडधान्य, आले, लिंबू, कोबी, फ्लॉवर्स, दिडका, टोमॅटो, गवारी, मुळा, कांदे, कारली अशा विविध प्रकारच्या भाज्यांचे दुकाने लावली होती. याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये बटाटेवडा, भेल, पाणीपुरी, शेवपुरी, चाट, रगडा, नूडल्स, पोहे, शाबुवडे, पॅटीसचे स्टॉल लावले होते.
शैक्षणिक साहित्य मध्ये वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, पाटी, खडू, पेन्सिल शिवाय चॉकलेट, गोळ्या, बिस्किट अशा विविध प्रकारची दुकाने लावून मुलांनी आर्थिक व्यवहाराचे ज्ञान घेतले. या कार्यक्रमास यावेळी संचालक विक्रमादित्य धुमाळ, माध्यमिक मुख्याध्यापक एस.एस. पचंडी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक बाचने, एम. डी. खोत, यू. आर. पवार, एस. बी. पवार, एस. आर. चव्हाण, एस. आय. किवंडा, व्ही. बी. पाटील, आर. एस. माने, एस. एस. कुलकर्णी, ए. एम. कुंभार, यु. एम. पाटील, एस. के. जोशी, एस. पी जगदाळे, यु. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ, आर. पी पाटील, एस. ए. रावळ त्यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
—————————————————————-
व्यवहार ज्ञानात भर
अनेक कुटुंबामध्ये आई-वडिलच आठवडी बाजार करतात. त्यामुळे भाजीपाला व इतर साहित्याची किंमत विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यासाठी मुलांच्या व्यवहारिक ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये आठवडी बाजार हा प्रामुख्याने दरवर्षी भरविला जातो. यावर्षी देखील या उपक्रमाचे नियोजन केल्याचे संस्थेचे अध्यक्षा ए. सी. धुमाळ यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta