निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेची गळतगा शाखा आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गळतगा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये गळतग्यासह परिसरातील १०६ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.
संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
रमेश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी केली. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
राजू पोवार यांनी, निपाणी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात रयत संघटनेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहेत. याशिवाय शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जात आहेत. त्याचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी
सर्जेराव हेगडे, सागर हवले, राकेश पाटील, बाबासाहेब पाटील, महेश जनवाडे, कलगोंडा कोटगे मल्लू रुग्गे, लक्ष्मण पीसुत्रे, महावीर चेंडके, द्वारपाल डोणगे, सुभाष चौगुले, राजेंद्र उपाध्ये, संभाजी तिळपकर, प्रकाश माने, पिंटू तेरदाळे, दौलत इंगळे, विशाल माळवदे, प्रकाश कुंभार, सुनील चौगुले यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, महिला उपस्थित होत्या.