
कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावरती बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार अनुभवयास मिळाला. यामध्ये टोल नाक्यावरील एक बूथ जळून खाक झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणी होऊन कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक केए 01 एजे 3929 हा कोगनोळी टोल नाक्या दरम्यान आल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्यामुळे टोलनाक्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या कठड्यावरती जाऊन आदळला. यावेळी डिझेलच्या टाकीला स्पार्किंग होऊन ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रक जळून खाक झाला तसेच टोलनक्यावरती असलेला बूथ ही जळाला.
Belgaum Varta Belgaum Varta