
कोल्हापुरचे पालकमंत्री आबिटकर; निपाणीस सदिच्छा भेट
निपाणी (वार्ता) : सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कट्टीबद्ध आहे. महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारच्या आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ सीमा भागातील नागरिकांना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आबिटकर यांनी निपाणीस सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांच्याशी कार्यालयात मंत्री आबिटकर यांनी भेट देऊन चर्चा केली.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व रोहन साळवे यांनी मंत्री आबिटकर यांचे स्वागत केले. यावेळी सीमाभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध असलेल्या आरोग्य योजनांवर चर्चा करण्यात आली. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून आपण निपाणी परिसराशी संपर्कात आहोत. येथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करार असल्याचे सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक वळिवडे, भालचंद्र पारळे, दीपक सावंत, रामचंद्र निकम, बाळासाहेब कमते, प्रदीप सातवेकर, ओंकार बोंगार्डे, रघुनाथ नाईकवाडे, निलेश पावले यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta