
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक साहित्य वाटप अंतर्गत निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व मुलींची शाळा भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतेवेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती विषयी तसेच पुढे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विविध प्रकारच्या तांत्रिक तसेच बी सी ए, एम बी ए, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सहकार्य शिवाजी विद्यापीठातील तज्ञ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडतात आणि वेगवेगळ्या सरकारी आस्थापणात आपण सरकारी अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावू शकता. महाराष्ट्र सरकार आपल्याला नेहमीच सीमाभागातील मराठी जनतेला आपला म्हणून सर्वच विभागात आपुलकी दाखवते याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती मीडिया व खजिनदार नेताजी पाटील, कार्यकारी शिवाजी पाटील, रामदास कुंभार, प्रवीण पाटील उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta