
निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात ही बैठक होणार असून या बैठकीस कार्यकर्ते तसेच मराठी प्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी भाग व युवा समिती निपाणी यांच्या वतीने प्रा.डॉ. अच्युत माने सर, श्री. जयराम मिरजकर व श्री. लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta