
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित पाटील यांनी सर्व शाळांमध्ये शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, मराठी मातृभाषा ही आपली नुसती बोली भाषा नसून तिला एक पुरातन ऋषीमुनी काळापासून महत्व आहे सर्व संतांनी आपल्या अभांगातून तिची थोरवी गोड गायिली आहे. त्यामुळे आपल्या भाषेला महत्त्व आहे आणि सर्वांनी शिक्षण घेवून आपल्या भाषे बरोबर आपला आणि आपल्या कुटुंबाचा उध्दार आणि समृध्दी येईल असे ज्ञान घ्यावे. पुढे महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे करण्यात येत आहे. यातून मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासनाच्या सेवेत अनेक तरुण सीमाभागतील आपले कर्तव्य बजावत आहेत असे शिक्षण विद्यार्थी यांनी आत्मसात करावे. यावेळी अमोल पाटील, विशाल लोहार प्रवीण आबाने व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta