निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका आणि युवा समिती निपाणी तालुका यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यामध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मत्तीवडे येथे बैठक पार पडली.
सीमाभागात चालू असलेली कन्नडसक्ती, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने सीमा भागातील मराठी भाषिक जनतेला त्यांच्या भाषेतून मराठी कागदपत्रे देण्यात यावी, या सर्व आदेशाला धुडकावून अंमलबजावणी न करता घटनेने दिलेला अधिकार हक्क याची होणारी पायमल्ली या सर्वामध्ये सीमा भागातील जनता भरडून जात आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समिती बेळगाव यांच्या कार्य पद्धतीनुसार सीमा प्रश्न विषयी घेतलेली भूमिका याविषयी सर्व पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवून आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात बेळगाव समितीच्या ध्येयधोरण, विचारानुसार निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समिती कार्य करेल आणि सर्व कटिबध्द राहतील असे ठरवून बैठकीची संपन्नता झाली.
यावेळी उपस्थित तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष श्री. अजित पाटील, उपाध्यक्ष आनंदा रणदिवे, कार्याध्यक्ष बंडा पाटील, मीडिया खजिनदार नेताजी पाटील, युवा समिती अध्यक्ष अमोल शेळके, उपाध्यक्ष गणेश माळी, कार्याध्यक्ष संतोष निढोरे, कार्यकारी सचिन पाटील, अमोल पाटील, सौरभ केसरकर, अर्जुन केसरकर कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta