महादेव यात्रेनिमित्त भव्य आयोजन
निपाणी (वार्ता) : वाळकी येथील ग्रामदैवत महादेव यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.९) सकाळी पार पडलेल्या भव्य बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वार शर्यतीत पाचगाव येथील सागर पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.
जनरल बैलगाडी शर्यतीत सागर पाटील-पाचगाव यांनी ३० हजार रुपये रोख आणि चांदीचा रथ मिळवत बाजी मारली. बंडा खिलारे-दानोळी यांनी २५ हजार रुपयांचे दुसरे, तर सुनील मरडे-ननदी यांनी २० हजार रुपये व निशाणासह तिसरे पारितोषिक मिळवले.
घोडागाडी शर्यतीत राहुल काळे-कोल्हापूर यांनी ८ हजार रुपये मिळवत विजेतेपद मिळवले. विजय पाटील-यमगर्णी यांनी ६ हजारांचे द्वितीय, तर निपाणी बेगम यांनी ४ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले.
बैल-घोडागाडी शर्यतीत बंडा खिलारे-दानोळी, दीपक बन्ने-तारदाळ, किशोर पाटील-भिवशी यांनी अनुक्रमे ९ हजार, ८ हजार व ७ हजार रुपये मिळवत प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावले. तर घोडेस्वार शर्यतीत निपाणी बेगम, महादेव इंगळे- वाळकी व बाहुबली चांडके- वाळकी यांनी अनुक्रमे ४ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे व निशाण मिळवले.
यात्रा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शर्यतींचे पूजन व उद्घाटन झाले. विजेत्यांना सुजय पाटील, खंडेराव पाटील, राहुल डोणे, महादेव कौलापुरे, चंद्रकांत डोणे, संतोष खोत, चंद्रकांत हिरेमठ, सुधीर खोत, चंद्रकांत पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील यांच्यासह समिती सदस्यांनी बक्षिसे प्रदान केली.
Belgaum Varta Belgaum Varta