कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धा
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत. विज्ञान स्पर्धा व कृतियुक्त शिक्षणामुळे विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होवून कल्पकतेला चालना मिळते, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुका पातळीवरील विज्ञान वाचन गोष्टी व विज्ञान नाटक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नाईक बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
स्पर्धा संयोजक प्रविण कागे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचे स्वरूप व उद्देशाची माहिती दिली. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धेत श्रावणी माने-सरकारी हायस्कूल डोणेवाडी, पृथ्वीराज सावंत-ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी, रोहन मुल्ला- सरकारी हायस्कूल बारवाड यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविले. विज्ञान नाटक स्पर्धेत आदिती पिसूत्रे व सहकारी- सरकारी हायस्कूल यमगर्णी, ख़ुशी शेख व सहकारी- कन्या शाळा, निपाणी यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविले. परीक्षक म्हणून संतोष पाटील, सुनीता कोगले, देवयानी माळगी, तेजस्विन बेळगली, इरफान खानापुरे, राकेश तावदारे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धाकांना प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले.प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे
कार्यक्रमास शिक्षण संयोजक महालिंगेश, टी. एम. यादव, ए. ए. चौगुले, हरिदास चव्हाण, के. जगदीश, एम. एम. चिक्कोडे, एच. के. बोते, अश्विनी गुरव, स्वाती बेळगुद्री, एस. एस. मुतगेकर यांच्यासह तालुक्यातील विविध शाळामधील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. के. ए. नाईक यांनी सूत्रसंचालन केले. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta