निपाणी (वार्ता) : येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शाळा, संघटना व समित्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
एसडीएमसी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. स्वागत व्ही. पी. दोड्डमणी यांनी केले.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आमदार शशिकला जोल्ले व गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या हस्तेही मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्ही.एस.एम. शाळा कुरली, कन्नड शाळा, शिरगुप्पी रोडवरील के.एल.ई. शाळा, कॉलेज, अरफात मुस्लिम कमिटी आदींसह विविध संस्थांनीही सत्कार समारंभ आयोजित केले.
मुल्ला यांनी आपल्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
पर्यवेक्षक विजय कांबळे, स्काऊट-गाईड प्रमुख टी.बी. लोकरे, तालुका सरकारी नोकर संघाचे बापू शितोळे, मुख्याध्यापिका जे.एम. मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास चंद्रकांत कब्बुरे, संदीप हेगडे, जी.बी. गलबी, शकुंतला तोंडीकट्टी, अश्विनी पाटील, एस.बी. शास्त्री, आर.एस. नारायणकर, एच.ए. बाणदार, नीता चौधरी, विद्या कलादगी, अनिता वालीकर, नंदा कांबळे, तबरेज पठाण, दशरथ बलुगडे, दिलीपकुमार केंगारे यांच्यासह अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta