निपाणी (वार्ता) : येथील विनायक शेटके यांच्या मातोश्रीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये इतका होता. यावेळी आर्थिक मदतीसाठी विनायक शेटके यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष निलेश हत्ती यांची भेट घेतली. त्यानुसार संबंधित कुटुंबीयांना महाराष्ट्र येथील मुख्यमंत्री सहायता निधीतून १ एक लाख रुपयाची मदत देण्यात आली. ॲड.निलेश हत्ती यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याशी संपर्क साधून बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रयत्नातून सीमा भागातील बांधवांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अर्ज भरला होता. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी आनंद अपटेकर, संदीप मोहिते, रमाकांत कोंडुस्कर, निलेश हत्ती, श्रेयस आंबले यांचे सहकार्य लाभले.
विनायक शेटके यांना एक लाख रुपयांचा मदत निधी जमा झाला आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ५५ लाख रुपये निधी आत्तापर्यंत सीमा भागातील गरजूंना मिळवून दिला आहे. २२ प्रकारच्या आजारावर हा निधी जात, धर्म, भाषा, भेद विरहित देण्यात येत आहे.
या निधीची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta