निपाणी : चिक्कोडी जिल्हा शिक्षण केंद्र निपाणीमधील शैक्षणिक संस्थेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याकडून जी फी व्यतिरिक्त ज्यादा रक्कम घेतली जात असल्याने सर्व शाळेत पालकांना दिसण्यासारखे फी चे संदर्भात माहिती फलक डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात अनेक वेळा निपाणी बी.ई.ओ. यांना तक्रार केली असून त्यावर योग्य ती कार्यवाही बी.ई.ओ. केली नसल्याने फोर जे आर ह्यूमन राईटस् केअर ऑर्गनायझेश या संघटनेकडून अप्पर आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण विभाग धारवाड यांना तक्रार केली होती. या सर्व बाबींची चौकशी करून यावर योग्य कार्यवाही करून संघटनेस माहिती देण्याकरीता अप्पर आयुक्तांनी उपसंचालक (प्रशासन) शालेय शिक्षण, शैक्षणिक जिल्हा, चिक्कोडी यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता शाळेमध्ये जादा आकारण्यात येणाऱ्या फी ला आळा बसणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta