Sunday , December 7 2025
Breaking News

चित्त थरारक मर्दानी प्रात्यक्षिकामुळे दौडीमध्ये रंगत

Spread the love

 

निपाणी झाली भगवेमय; शिवकालीन मावळ्यांचाही सहभाग

निपाणी (वार्ता) : आठ दिवसापासून नवरात्रोत्सवानिमित्त शहर आणि उपनगरात दुर्गामाता दौडी आहेत. त्याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. सोमवारी (ता.२९) पहाटे येथील
निपाणी विभाग आणि संभाजीनगर मधील संयुक्त छत्रपती मंडळातर्फे उपनगरतील शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड दौडीमध्ये मावळ्यांसह शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले. त्यामुळे दौडीच्या मार्गावरील नागरिक व भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
प्रगतीनगर भागात श्री दुर्गा माता दौड उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पहाटे ५ वाजता छत्रपती संभाजी नगरातील हनुमान मंदिरापासून दौडीस प्रारंभ झाला. आकाश घुगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे पूजन व शस्त्र पूजन करून प्रेरणा मंत्र सादर करण्यात आला. त्यानंतर संभाजीनगर, शिंदेनगर, जुने संभाजीनगर, श्रीनगर, आंदोलननगर, बसवाननगर, सरकार कॉलनी मधील मुली, महिला व नागरिकांनी दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दौडच्या मार्गावर प्रेरणा मंत्र, दुर्गा मातेचे नामस्मरण, भज, कीर्तन, अभंग सादर करण्यासह विविध देवदेवतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. प्रगतीनगर येथील मंडळाने पुष्पवृष्टी करून दौडीचे स्वागत करून दूध व केळीचे वाटप केले. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. यावेळी नामस्मरणाचे महत्व, लव्ह जिहादचे परिणाम पटवून देण्यात आले. सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मर्दानी खेळ, लाठी काठी, दांडपट्टा, तलवार चालवणे, भाला फेकणे, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी बबन निर्मले, अजित पारळे, सुनील दळवी, दीपक खापे, सागर नकुले, श्रवण कोळी, विशाल जाधव, राजेश आवटे, संतोष देवडकर, निलेश पठाडे, अरुण खडके, विनोद बल्लारी, सोमनाथ शिंपूकडे, नंदन जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *