

प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र
निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ शकणारी शक्ती आहे.तंत्रज्ञानाने सध्याच्या युगात साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराला नवीन दिशा दिली आहे. ई-पुस्तके, डिजिटल ग्रंथालये, सोशल मीडिया आणि ऑनलाइन अभ्यासक्रम, साहित्यालाजागतिक पातळीवर घेऊन जात आहेत. पण या प्रगतीमध्ये, मानवी मूल्ये आणि संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपणे महत्वाचे आहेअसे मत कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. तृप्ती करेकट्टी यांनी व्यक्त केले.
बेळगांव येथील केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात गुरुवारी(ता.९) राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र झाले. कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या चार भाषा विभागातर्फे’साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान: आधुनिक भाषा चिंतन’या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. हुरळी होते.
प्रारंभी प्रा. डॉ. एस. आर. रयमाने यांनी स्वागत तर के. एम. शंकरमूर्ती यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य हुरळी म्हणाले,सध्याच्या साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन कल्पना निर्माण करणे गरजेचे आहे. सीमावर्ती भागातील साहित्य आणि तंत्रज्ञानाची जाणीव करून देऊन भाषेचे सांस्कृतिक महत्त्व आणि प्रासंगिकता यावर चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त केली. ‘आम्ही अक्षर सूर्य’ या जर्नलमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमधील अनेक विद्वान, प्राध्यापक, व्याख्याते आणि संशोधक, विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कन्नड १७६ पेक्षा अधिक संशोधन लेख ई-जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.
यावेळी रवींद्र शेट्टी, समन्वयक डॉ.अतुलकुमार कांबळे, प्राचार्या हेमा चिकमठ, डॉ. बसवराज जनगौडा, सुधीर कोठीवाले, व्ही.जी.कंकणवाडी, डॉ. विनोद मगदूम, आनंद केंचन्नावर, एन. एस. बेळगावकर, डॉ. एम.डी. गुरव, डॉ. टी. व्ही. नंदी, मंजुळा के. यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta